Thursday, January 14, 2010

रामची बडबड

आम्ही दोघे हल्ली रोजच रामच्या बोलण्याचं कौतुक करत असतो.  काय तो ४ १/२ वर्षांचा मुलगा बोलतो.. बापरे...

प्रीतिने तर त्याची वाक्य नोंदायचा तिचा जुना प्रकल्प परत सुरु केलाय.

प्रीति सकाळी उठली की तो रात्री काय बडबड करत होता ते सांगते आणि ऑफिस मधे आल्यावर सकाळी काय म्हणाला ते सांगते. तो रोज काही तरी नविन बोलतो जे आम्हाला एकदमच high level वाटतं आणि त्याच्या कड़े आगणित विषय असतात बोलायला. त्याच्या बडबडीच्या आवडत्या वेळा म्हणजे रात्री झोपताना, काही खाताना (जेवताना), आंघोळ करताना.

तो त्याच्या मित्रांसोबत तर काही गप्पा मारतो. आमच्या सोबत इंग्रजी बोलताना तो सहज (म्हणजे भारतीय accent मधे) बोलतो पण मित्रांशी बोलताना मात्र अमेरिकन accent मधे, म्हंजे जसा काही तो ३ भाषा बोलतो; मराठी, भारतीय इंग्रजी आणि अमेरिकन इंग्रजी.

कार मधे बसला असताना त्याला बोलायला आवडत नाही, क्वचित बोलतो आणि तो शांत असला कि आम्हाला हुरहुर वाटते.


मला तर त्याच्या सोबत वाद-विवाद पण करायला आवडतात; त्याची clarity of thinking आणि express करण्याची ability (दोन्ही भाषेत) बघून थक्क होतो मी.

त्याच्या सोबत walk ला जायला पण मजा येते, मस्त गप्पा टप्पा अणि प्रश्न विचारणं आणि स्वतः उत्तर देणं. सगळाच मजेशीर प्रकार असतो.

काल-परवाच त्याची teacher म्हणत होती कि तो मस्त्या करतो पण गोड मस्त्या करतो, म्हणजे असा कि त्याला सगळं समजतं पण आपली मजा घेतोय की काय.

1 comment:

  1. too gud jiju.....keep writing....n keep us also updated with these kind of things of life....
    it was so nice to read this....:)

    ReplyDelete